भारताच्या विजयाची चार कारणे

मोहालीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाला नमवत भारताने सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. भारताच्या खेळात असं काय होत ज्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर भारी पडला. 

Updated: Mar 28, 2016, 07:59 AM IST
भारताच्या विजयाची चार कारणे title=

मोहाली : मोहालीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाला नमवत भारताने सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. भारताच्या खेळात असं काय होत ज्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर भारी पडला. 

1. विराट कोहली - वर्ल्डकपमध्ये भारताच्या प्रत्येक सामन्यात विराट कोहलीने मोलाची भूमिका बजावलीये. पहिले तीन विकेट बाद झाल्यानंतर विराट कोहलीने पुन्हा एकदा संयमी खेळाचे प्रदर्शन करताना भारताच्या पदरात विजय दिला. यामुळेच भारताला ऑस्ट्रेलियाचा पराभव करता आला. 

२. रनिंग बिटवीन द विकेट - युवराज सिंगला बॅटिंग करताना दुखापत झाली. त्यामुळे त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. तो बाद झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळण्यास आला आणि त्याने जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट केली. 

३. पहिल्या पाच षटकांत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. मात्र त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी ज्याप्रमाणे गोलंदाजी केली ती स्तुत्य आहे. युवराज सिंग आणि रवींद्र जडेजाने ६ षटकांत केवळ ३९ धावा दिल्या. 

४. कॅप्टन कूल धोनी- धोनीने पुन्हा एकदा दाखवून दिले की दबावात संघाचे नेतृत्व कसे करायचे असते ते. धोनीला पराभवाची भिती वाटत नाही मात्र त्यावेळी तो अधिक वेगाने विचार करु लागतो की त्या परिस्थिततही संघाला विजय कसा मिळवून देता येईल ते.