कोलंबो : न्यूझीलंडच्या संघाने आपल्या देशाकडून खेळण्यासाठी संपर्क केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट श्रीलंकेचा ऑलराउंडर थिसारा परेराने केला आहे. एका लोकल वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत परेराने सांगितले की, ‘ऑउट ऑफ फॉर्म झाल्याने राष्ट्रीय संघातून काढण्यात आल्यानंतर न्यूझीलंडने संपर्क केला होता.
परेराने सांगितले की, त्यावेळी माझी मानसिकता ठिक नव्हती आणि टीममधून वगळ्यात आल्याने दबावात होतो त्यावेळी न्यूझीलंड संघाने माझ्याशी संपर्क करण्यात आला. सर्वात प्रथम न्यूझीलंडची नागरिकता देण्यात येणार होती त्यानंतर मी राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळणार होती. या ऑफरबद्दल बोलताना सांगितले की, एकेकाळी मी ही ऑफर घेण्याच्या बाजूने होतो. पण नंतर मला जाणविले की मला माझा देश असलेल्या श्रीलंकेकडूनच खेळले पाहिजे. दरम्यान, हे समोर आले नाही की कोणी आणि कसा परेराशी संपर्क केला होता.
या सर्व प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी खूप मदत केली. राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नको. धर्याने निर्णय घे. राष्ट्रीय संघात खेळण्यासाठी मी तुझी मदत करेल.
राष्ट्राध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर परेराची राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले. टी-२० लीगमध्ये खेळण्यावरून मुख्य सेलेक्टर सनथ जयसूर्यासोबत परेराचा वाद झाला होता. त्यानंतर त्याला संघातून काढून टाकण्यात आले होते.
नुकतीच पाकिस्तान विरुद्ध खेळण्यात आलेल्या वन डे सिरीजमध्ये परेराने शानदार कामगिरी करत मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.