ढाका : भारताने आयसीसी अंडर १९ वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सराव सामन्यात पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव केला आहे.
डावखुरा गोलंदाज खलील अहमद याने ८ षटकात ३० धावा देऊन ५ विकेट घेतल्या आणि पाकिस्तानला १९७ धावांवर गुंडाळले. नंतर तुफानी खेळी करत सरफराज खान याने ६८ चेंडूत ८१ धावा तडकावल्या. त्यात १२ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे.
भारताने १९८ धावांचे टार्गेट ३३.४ षटकात पूर्ण केले. सामना उशीरा सुरू झाल्याने सामना ४५ षटकांचा करण्यात आला होता.
पाकिस्तान अंडर १९ - सर्वबाद १९७, ४४.१ षटके (मोहम्मद उमर ३६, हसन मोसीन ३३, सलमान फय्याज २९, गुहार हाफीज २५, भारत - खलील अहमद ५/३०)
भारत अंडर १९ - १९८/५. ३३. ४ षटके, (सरफराज खान ८१, वॉशिंग्टन सुंदर २८ नाबाद, महिपाल लोमरोर २२ नाबाद, हसन मोसिन २/२३, शाहदाब खान २/५६)