Video : या जबरदस्त कॅचमुळे प्रेक्षकाने जिंकले अडीच लाख रुपये

न्यूझीलंडमधील लोकल टी- २० सामन्यात एका प्रेक्षकाने एका हाताने घेतलेला कॅच त्याला मालामाल करून गेला. फलंदाजाने सीमारेषेबाहेर पाठविलेला चेंडून त्याने एका हाताने जबरदस्त पकडला आणि त्याला चक्क ५ हजार डॉलर म्हणजे अडीच लाखांचे बक्षिस मिळाले.

Updated: Nov 13, 2014, 05:25 PM IST
Video : या जबरदस्त कॅचमुळे प्रेक्षकाने जिंकले अडीच लाख रुपये title=

वेलिंग्टन : न्यूझीलंडमधील लोकल टी- २० सामन्यात एका प्रेक्षकाने एका हाताने घेतलेला कॅच त्याला मालामाल करून गेला. फलंदाजाने सीमारेषेबाहेर पाठविलेला चेंडून त्याने एका हाताने जबरदस्त पकडला आणि त्याला चक्क ५ हजार डॉलर म्हणजे अडीच लाखांचे बक्षिस मिळाले.

ओटागो व्होल्ट आणि वेलिंग्टन फायरबर्ड यांच्या हा सामना रंगला होता. ओटागो व्होल्टच्या ब्रेसवेल याने १३ व्या षटकात पटेलच्या चेंडूनवर तडाखेबाज प्रहार करत चेंडून सीमारेषेबाहेर टोलावला.  त्याला सहा धावा मिळाल्या पण तो कॅच ज्या प्रेक्षकाने डाइव्ह मारून पकडला तो आतापर्यंतचा सर्वात बेस्ट कॅच असल्यामुळे यू ट्यूबवर व्हायरल झाला आहे.  यू ट्यूबवर या व्हिडिओला ७ लाख ३९ हजारापेक्षा अधिक हिट्स मिळाल्या आहेत. 

तुम्ही हा व्हिडिओ पाहा आणि तुमच्या मित्रांनाही ही बातमी शेअर करा. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.