विनोद आणि माझी जीवनशैली वेगळी होती - सचिन

बऱ्याच दिवसांनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या बालपणीचा मित्र विनोद कांबळीबद्दल बोलताना दिसला. 

Updated: Nov 13, 2014, 03:29 PM IST
विनोद आणि माझी जीवनशैली वेगळी होती - सचिन title=

लंडन : बऱ्याच दिवसांनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या बालपणीचा मित्र विनोद कांबळीबद्दल बोलताना दिसला. 

विनोद बद्दल बोलताना तेंडुलकरनं त्याची आणि आपली जीवनशैली वेगळी होती, असं म्हटलंय.

तेंडुलकरनं क्रिकेट जगतात अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलेत तर विनोद कांबळी मात्र आपल्या क्षमतेसोबत आणि प्रतिभेसोबत न्याय करू शकला नाही. १७ टेस्ट खेळूनच त्याला मैदानाला राम-राम ठोकावा लागला. 

कांबळीबद्दल विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना, मी प्रतिभेबद्दल बोलणार नाही कारण, प्रतिभेचं मोजमाप करणं माझं काम नाही, असं सचिननं म्हटलंय. 

पण, आमच्या दोघांत फरकच करायचं म्हटलं तर मी फक्त एव्हढंच म्हणेन की त्याची आणि माझी जीवनशैली वेगवेगळी होती... आमचे स्वभाव वेगळे होते... आणि समोर आलेल्या प्रसंगांचा सामना आम्ही वेगळ्या पद्धतीनं केला... असंही सचिननं स्पष्ट केलं. 

‘माझ्यावर नेहमीच माझ्या कुटुंबांच्या नजरा असायच्या त्यामुळे माझे पाय नेहमीच जमिनीवर राहिले... मी विनोदबद्दल नाही बोलू शकतं...’ असंह यापुढे जाऊन सचिननं म्हटलंय.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.