बंगळुरु : आयपीएल-९ मध्ये फायनलमध्ये धडक मारणारी आरसीबी आणि गुजरात लायन्समध्ये काल कांटे की टक्कर झाली. गुजरात लायन्स आणि आरसीबी या दोन्ही टीमची सुरुवात खराब झाली. दोन्ही टीमच्या ओपनर्सने लवकर विकेट गमावल्या. ड्वेन स्मिथने शानदार 31 बॉलमध्ये 73 रन्स केले. त्यामुळे गुजरात लायन्स १५९ रन्सपर्यंत पोहचू शकला.
एबी डिविलिएर्सच्या चांगल्या खेळीमुळे बंगळुरु विजयी झाला. पण यामॅच विराट कोहलीचा आक्रमकपणा पुन्हा दिसून आला.
जडेजाच्या चौथ्या बॉलमध्ये विवाद झाला. बिन्नीला चुकीच्या पद्धतीने आऊट दिलं गेल्यामुळे बिन्नी आणि विराट संतापले. विराटने थेट फोर्थ अंपायरकडे धाव घेतली. त्यानंतर रिप्लेमध्ये कुमार धर्मेसेना यांचं डिसीजन चूकीचं असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर विराटने एक कॅच आऊट केला. पण अंपायरने तो आऊट नसल्याचं सांगितलं. त्यानंतर विराट पुन्हा अंपायरकडे धावत गेला आणि यावर नाराजी दशर्वली. त्यानंतर थर्ड अंपायरने विराटचा कॅच योग्य पद्धतीने घेतला होता हे दाखवत आऊट देण्यात आलं.