'विराट' आक्रमकतेचं चहुकडून कौतुक!

विराट कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवतोय. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये या दिल्लीकर बॅट्समनचाच बोलबाला आहे. विराटच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यानं सलग पाच टेस्ट सीरिज जिंकण्याची किमया साधली आहे. सुरुवातीला आक्रमक अंदाजामुळे कायमच टीकेचं लक्ष्य झालेल्या कोहलीच्या आक्रमकतेचं आता क्रिकेटच्या दुनियेतून कौतुक केलं जातंय.

Updated: Dec 21, 2016, 09:12 PM IST
'विराट' आक्रमकतेचं चहुकडून कौतुक! title=

मुंबई : विराट कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवतोय. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये या दिल्लीकर बॅट्समनचाच बोलबाला आहे. विराटच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यानं सलग पाच टेस्ट सीरिज जिंकण्याची किमया साधली आहे. सुरुवातीला आक्रमक अंदाजामुळे कायमच टीकेचं लक्ष्य झालेल्या कोहलीच्या आक्रमकतेचं आता क्रिकेटच्या दुनियेतून कौतुक केलं जातंय.

'पार्टी हार्ड अॅन्ड प्रॅक्टिस हार्ड'

2016 चा क्रिकेट सीझन हा विराट कोहलीचा सीझन होता. या सीझनमध्ये त्यानं टीम इंडियाला टेस्टमध्ये बेस्ट बनवलं. एक कॅप्टन म्हणून आपल्या नेतृत्व गुणांनी त्यानं टीम इंडियांचं यशस्वी नेतृत्व केलं. त्याचबरोबर बॅट्समन म्हणूनही तो कमालीचा यशस्वी झाला. 

'पार्टी हार्ड अॅन्ड प्रॅक्टिस हार्ड' हा कोहलीच्या लाईफचा फंडा आहे. कोहली आपल्या बिनधास्त आणि आक्रमक अंदाजासाठी क्रिकेट जगतामध्ये ओळखला जातो. मात्र, क्रिकेट विश्वातून कोहलीला आक्रमकपणासाठी टीकाकारांनी कायमच लक्ष्य केलं. मात्र, कोहलीचा आक्रमकपणाच आता टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी फायदेशीर ठरतोय. त्याचप्रमाणे टेस्टमध्ये कॅप्टन्सीची धुरा सांभाळल्यानंतर तर त्याची बॅटिंग आणखी बहरलीय.

कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडीत

2016 मध्ये कोहलीच्या नेतृत्वाखील टीम इंडियानं 12 टेस्ट खेळल्या आणि यात भारतानं एकही टेस्ट गमावली नाही. 9 टेस्ट भारतानं जिंकल्यात. तर तीन टेस्ट ड्रॉ झाल्या. कोहलीच्याच नेतृत्वाखील भारतीय टीम सलग 18 टेस्टमध्ये अपराजित आहे. कपिल देव यांचा विक्रम मोडित काढत कोहलीनं नवा विक्रम रचला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं सलग पाच टेस्ट सीरिजमध्ये विजयही मिळवला.

2015 पासून टीम इंडियाचा टेस्टमध्ये विजयरथ सुरु झाला. भारतानं श्रीलंकेला 2-1 नं पराभूत केलं होतं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची होमसीरिज 3-0 ने जिंकली. तसंच वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमित 2-0 नं पराभूतही केलं होतं. न्यूझीलंडला तर टेस्ट सीरिजमध्ये कोहलीच्या टीमनं 3- 0 नं व्हाईट वॉशही दिला. तर 2016च्या अखेरीस झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 4-0 नं बाजी मारली. त्याचप्रमाणे 12 टेस्टमध्ये  कोहलीनं 60.41 च्या सरासरीनं 1215 रन्स केलेत. यात चार सेंच्युरीज आणि 2 हाफ सेंच्युरीजचा समावेश होता. चार सेंच्युरीजमध्ये कोहलीच्या तीन डबल सेंच्युरीज आहेत. 

विराट कोहली टेस्टमध्ये सुपरहिट ठरलाय. मात्र, त्याची आता खरी कसोटी परदेशी खेळपट्ट्यांवर लागणार आहे. या चॅलेंजसाठीही कोहली सज्ज आहे. त्याचप्रमाणे टेस्टनंतर वन-डे आणि टी-20 ची धुराही त्याच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.