मुंबई : दोन वेळची विम्बल्डन चॅम्पियन पेट्रा क्विटोव्हा चाकू हल्ल्यातून थोडक्यात बजावली... तिच्या राहत्या घरी घरफोड्यांनी तिच्यावर चाकूनं वार केले. यात तिच्या हाताला जबर दुखापत झालीय. त्यामुळे तिला तीन महिने टेनिसकोर्टपासून दूर रहावं लागणार आहे.
चेक रिप्बलिकची टेनिसपटू पेट्रा क्विटोव्हावर चाकू हल्ला झाल्याची बातमी आली आणि अवघ्या टेनिसविश्वाला धक्का बसला. क्विटोव्हा दरोडेखोरांच्या हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचावली. क्विटोव्हावर तिच्या राहत्या घरी हा हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. क्विटोव्हाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं.
तिच्या डाव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्यावर हल्ला करण्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दरम्यान, क्विटोव्हाच्या प्रवक्त्यांकडून तिच्यावर हल्ल्याची घटना टेनिसप्रेमींपर्यंत पोहचली. या घटनेनंतर तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणाऱ्यांचे तिनं सोशल नेटवर्किंग साईटवरुन आभारही मानलेत.
'मला पाठिंबा देणाऱ्या शुभचिंतकांचे मनापासून धन्यवाद... माझ्यावर हल्ला झाल्याचं तुम्ही एकेलं असेलच... माझ्या अपार्टमेंटमध्ये माझ्यावर चाकू हल्ला झाला. स्वत:ला त्या चोरापासून वाचवण्यामध्ये माझ्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. मला मोठा धक्का बसलाय. मात्र, मी जीवंत असल्याचा आनंद आहे' असं पेट्रानं म्टटलंय.