अनुष्काच्या प्रेमात वेडा झालेला विराट विसरला आयपीएलचे नियम

वर्ल्ड कपदरम्यान चर्चेत आलेली विराट-अनुष्काची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रविवारी आयपीएल सामन्यादरम्यान क्रिकेटर विराट कोहलीने नकळत एक चूक केली आहे, ज्याचा परिणाम विराटला भोगावा लागू शकतो. 

Updated: May 18, 2015, 05:27 PM IST
अनुष्काच्या प्रेमात वेडा झालेला विराट विसरला आयपीएलचे नियम title=

नवी दिल्ली: वर्ल्ड कपदरम्यान चर्चेत आलेली विराट-अनुष्काची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रविवारी आयपीएल सामन्यादरम्यान क्रिकेटर विराट कोहलीने नकळत एक चूक केली आहे, ज्याचा परिणाम विराटला भोगावा लागू शकतो. 

रविवारी दिल्ली डेअरडेविल्स आणि रॉयल चॅलेन्चर्स बेंगलुरू यांच्यातील सामना पावसामुळे थांबला होता. या दरम्यान विराट आपली प्रेमिका अनुष्का शर्माला भेटण्यास स्टॅंडमध्ये गेला, दोघांमध्ये जवळपास ८ मिनीटं बोलणं झालं. तोपर्यंत सामना रद्द झाला नव्हता. मात्र अशाप्रकारे विराटने नकळत का होईना पण आईपीएलच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे आता नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआय विराटवर कारवाई करते की नाही हे पहावं लागणार आहे.  

याआधी अनुष्का स्टॅंडमध्ये बसून विराटला चिअर करत होती. सामना पावसामुळे थांबल्यानंतर लगेचच विराट अनुष्काला भेटण्यासाठी गेला. युवराज सिंगही तिथं उपस्थित होता. युवराज अनुष्कासोबत मस्करी करतांना दिसत होता. याआधीही अनुष्का विराटला चिअर करण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये गेली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.