भारतीय संघात कोहलीच्या टक्करचं कोणी नाही - बॅरी रिचर्ड्सच्या

विराट कोहलीला टक्कर देऊ शकेल असा कोणीही भारतीय संघात नाही, पण त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची उंची गाठायला त्याला अजून बराच लांब प्रवास करावा लागणार असल्याचे मत  दक्षिण आफ्रिकेचे महान फलंदाज बॅरी रिचर्ड्स यांनी व्यक्त केले आहे. 

Updated: Feb 24, 2015, 07:56 PM IST
भारतीय संघात कोहलीच्या टक्करचं कोणी नाही - बॅरी रिचर्ड्सच्या title=

पर्थ : विराट कोहलीला टक्कर देऊ शकेल असा कोणीही भारतीय संघात नाही, पण त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची उंची गाठायला त्याला अजून बराच लांब प्रवास करावा लागणार असल्याचे मत  दक्षिण आफ्रिकेचे महान फलंदाज बॅरी रिचर्ड्स यांनी व्यक्त केले आहे. 

यात कोणताही संशय नाही की विराट कोहीलीच्या तुलनेत भारताच्या सध्याच्या संघात कोणताही फलंदाज नाही. तो खूप प्रतिभावंत आहे. अशा फलंदाजाची फलंदाजी पाहण्यासाठी तुम्ही पैसे खर्च करण्याची तयारी दाखवू शकतात. विराट कोहली आज एबी डिव्हिलिअर्ससह विश्व क्रिकेटच्या टॉपच्या फलंदाजामध्ये सामील आहे. 

सर डोनाल्ड ब्रॅडमन हे डावखुरा फलंदाज म्हणून रिचर्ड्स यांना सर्वश्रेष्ठ फलंदाज मानत होते. त्यांना विचारले असता. कोहलीच्या तुलनेत अजिंक्य राहणे आणि शिखर धवन यांना कसे पाहतात. त्यावर ते म्हणाले. तुलना होऊच शकत नाही. ते कोहलीच्या जवळपासही नाही. ते वेगळ्या गोष्टीसाठी चांगले आहे. तो ज्या पद्धतीने आपल्या खेळाला आकार देतो ते सर्वांना आवडते. 

रिचर्ड्स यांनी दक्षिण आफ्रिका २१ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहण्यापूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या चार टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये त्यांनी ५०० धावा काढल्या होत्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.