अश्विन आणि जडेजाविषयी विराट म्हणाला....

टीम इंडियाला गरज असतांना ते समोरील टीमच्या बॅटसमनना अडचणीत आणू शकत नाही, त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात असतांना, टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीच्या मते, स्पिनर आर. अश्विन आणि रविंद्र जडेजाने त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना चुकीचं ठरवलं आहे.

Updated: Feb 24, 2015, 06:00 PM IST
अश्विन आणि जडेजाविषयी विराट म्हणाला.... title=

पर्थ : टीम इंडियाला गरज असतांना ते समोरील टीमच्या बॅटसमनना अडचणीत आणू शकत नाही, त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात असतांना, टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीच्या मते, स्पिनर आर. अश्विन आणि रविंद्र जडेजाने त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना चुकीचं ठरवलं आहे.

ऑफ स्पिनर अश्विन आणि डावखुरा स्पिनर जडेजाने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकाविरोधात महत्वाची भूमिका पार पाडली. या दोन्ही बॉलर्सने मिळून आतापर्यंत सहा विकेट घेतल्या आहेत. अश्विन आणि जडेजाने ३६.२ ओव्हर्स टाकल्या, त्यात त्यांनी १७५ रन्स दिले, त्यांचा इकोनॉमी रेट ४.३८ आहे.

विराट कोहलीने म्हटलंय, जर तुम्हाला आठवत असेल तर इंग्लडमध्ये चॅम्पियन्स ट्राफीत आपले दोन मुख्य बॉलर होते. जडेजा हा सर्वोत्कृष्ट बॉलर निवडला गेला. तेव्हा कुणी विचार केला नाही की, आपले स्पिनर आपले महत्वाचे बॉलर ठरतील. अश्विन आणि जडेजाने सर्वांना चुकीचं ठरवत, त्यांनी ऑस्ट्रेलियातही चांगली कामगिरी पार पाडली आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या डोक्यात विकेट घेण्याचेच विचार असावेत. पाकिस्तान विरूद्ध झालेल्या सामन्यात अश्विनच्या डोक्यात हीच गोष्ट होती. जडेजा नेहमीच आक्रमक बॉलर राहिलेला आहे, जर त्याला आणखी मदत दिली, तर तो आणखी विकेट पटकावू शकतो.

विराटच्या मते, बॉलिंगसाठी पार्टनरशीपही महत्वाची असते,  त्या दोन्ही जणांनी हे समजून घ्यायला हवं की, आक्रमक बॉलिंग कोण करेल आणि कोन मदतीची भूमिका ठेवेल.

जर दोन्ही आक्रमक आहेत आणि एका डावात तीन-चार विकेट घेत आहेत. तर हे टीम इंडियासाठी चांगलं आहे, त्यांना माहित आहे कधी कोणती भूमिका घ्यायची आहे, तसेच धोनीही त्यांच्या मदतीसाठी नेहमीच उभा असतो. म्हणून बॉलर्सची भागीदारी महत्वाची असल्याचं विराट कोहलीनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.