विराट कोहलीला मोजावी लागली लज्जास्पद पराभवाची किंमत

भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० सिरीजच्या दुसऱ्या सामन्यात आपल्या निराशाजनक प्रदर्शनामुळे आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये आपल्या नंबर वनचा मुकूट गमवला आहे. 

Updated: Oct 9, 2015, 07:50 PM IST
विराट कोहलीला मोजावी लागली लज्जास्पद पराभवाची किंमत  title=

दुबई : भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० सिरीजच्या दुसऱ्या सामन्यात आपल्या निराशाजनक प्रदर्शनामुळे आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये आपल्या नंबर वनचा मुकूट गमवला आहे. 

विराटने या महिन्याच्या सुरूवातील ऑस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिन्चला मागे टाकून नंबर १ वर जाण्याची कामगिरी केली होती. त्याने धर्मशाळा येथील टी-२० सामनन्यात ४३ धावा काढल्या होत्या. पण कटक येथील दुसऱ्या सामन्यात तो केवळ एक धाव काढून बाद झाला. तसेच तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे विराट कोहलीला रँकिंमध्ये १६ अंकाचे नुकसान झाले. तो ८६१ अंकावरून खाली सरकून ८४५ स्थानावर गेला आहे. त्यामुळे त्या नंबर १ चा मुकूट गमवावा लागला आहे. 

फलंदाजांच्या रँकिंगमध्ये विराट दुसऱ्या स्थानावर गेला आहे.  फिन्च पुन्हा एकदा क्रमांक १ वर गेला आहे. इंग्लडचा एलेक्स हेल्स तिसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस चौथ्या स्थानावर कायम आहे. धर्मशाळामध्ये शानदार शतक लावणाऱ्या रोहित शर्माने २१ स्थानावर उडी घेतली आहे. 

सुरेश रैना एका स्थानाने घसरून १२ व्या स्थानावर गेला आहे. महेंद्रसिंग धोनी तीन स्थानावरून घसरून ३६ व्या स्थानावर तर ओपनर शिखऱ ११ स्थानाने घसरून ९७ स्थानावर फेकला गेला आहे. मॅन ऑफ द सिरीज ठरलेला ऑलराउंडर जे. पी. ड्युमिनी ११ स्थानावर पोहचला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.