विस्डेनच्या कव्हरपेजवर विराटचा फोटो

क्रिकेटचे बायबल समजल्या जाणाऱ्या विस्डेनने आपल्या कव्हरपेजवर भारताचा कर्णधार विराट कोहलीचे चित्र छापलेय. 

Updated: Feb 4, 2017, 12:51 PM IST
विस्डेनच्या कव्हरपेजवर विराटचा फोटो title=

नवी दिल्ली : क्रिकेटचे बायबल समजल्या जाणाऱ्या विस्डेनने आपल्या कव्हरपेजवर भारताचा कर्णधार विराट कोहलीचे चित्र छापलेय. 

विस्डेनच्या कव्हरपेजवर जागा मिळवणे ही कोणत्याही क्रिकेटपटूसाठी मोठी गोष्ट आहे. गेल्या चार वर्षात विस्डेनच्या कव्हरपेजवर जागा मिळवणारा कोहली दुसरा क्रिकेटपटू आहे. 

याआधी २०१४मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकरचा फोटो विस्डेनच्या कव्हरपेजवर झळकला होता. विस्डेन क्रिकेट ऑल्मनॅक २०१७च्या कव्हरपेजवर रिव्हर्स-स्वीप शॉट मारतानाचा कोहलीचा फोटो आहे. ६ एप्रिलला हा फोटो प्रकाशित होणार आहे. विस्डेनने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली.