'बेसिक्सवर लक्ष, कमी प्रयोग म्हणून अश्विन यशस्वी'

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलंय, ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याचं मागील एक वर्षात प्रदर्शन सुधारलं आहे.

Updated: Nov 24, 2015, 05:24 PM IST
'बेसिक्सवर लक्ष, कमी प्रयोग म्हणून अश्विन यशस्वी' title=

नागपूर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलं. ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याचं मागील एक वर्षात प्रदर्शन सुधारलं आहे, कारण आर. अश्विनने बेसिकवर लक्ष दिलं आणि जास्त प्रयोग केले नाहीत. अश्विनने श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली, आणि दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेतही आपल्या गोलंदाजी प्रभावी ठरवली आहे.

कोहली तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आधी संध्याकाळी पत्रकारांशी बोलत होता,  जर मागील सहा महिन्यात तुम्ही आर अश्विनची गोलंदाजी पाहिली तर त्याने बेसिक्सवर लक्ष दिले आहे, तो आपल्या गोलंदाजीत फार प्रयोग करत नाहीय, तो नैसर्गिक गोलंदाजी आणि आपल्या जवळ शिल्लक असलेल्या प्रत्येक बॉलविषयी तो विचार करतो.

कोहली म्हणतो, अश्विन चेंडू फ्लाईट करतो, त्याचा फिटनेसही चांगला आहे, त्याला महत्वाच्या क्षणी बॉलिंग करण्यास मिळते, कारण चेंडू टाकण्यात, ताकद लावण्यात तो अधिक सक्षम होतो. अश्विनला इतर पिचवरही चांगला प्रतिसाद मिळतो, ज्या ठिकाणी इतर गोलंदाज संघर्ष करतात.

नवी दिल्ली : अभिनेता आमीर खानच्या असहिष्णुतेच्या मुद्यावर देशात पुन्हा एकदा वादविवादाला सुरूवात झाली आहे. भाजप नेत्यांनी आमीर खानवर निशाणा साधला आहे. आमीर खानच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, जर भारतात राहण्यात आमीर यांना भीती वाटत असेल, तर त्यांना ज्या ठिकाणी शांती वाटत असेल त्यांनी ठिकाणी त्यांनी रहावं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.