व्हिडिओ : नेमारने केला 'चमत्कार', गोल पोस्टच्या मागून केला गोल

 ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भौतिकशास्त्राच्या नियमांना फाटा देत चेंडू गोल पोस्टच्या मागून उडवत गोल केला आहे. 

Updated: Jun 12, 2015, 04:23 PM IST
व्हिडिओ :  नेमारने केला 'चमत्कार', गोल पोस्टच्या मागून केला गोल title=

ब्राझील :  ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भौतिकशास्त्राच्या नियमांना फाटा देत चेंडू गोल पोस्टच्या मागून उडवत गोल केला आहे. 

व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले की, कोपा अमेरिका कपमध्ये होंडुरासविरूद्धच्या सामन्यापूर्वी ब्राझीलच्या टीमसह नेमार सराव करीत आहे. तो गोल पोस्टच्या मागे सहा फुट मागे उभा असतो, सहकारी खेळाडूंना सांगतो की मी मागूनसुद्धा गोल करू शकतो.  नंतर त्याने चेंडूला हळूच पायाने मारले, चेंडू हळूच मैदानावर टप्पा पडल्यावर रिव्हर्स होऊन सरळ गोलपोस्टमध्ये जाते. 

नेमारचा हा चमत्कारीक गोल पाहून त्याचे सहकारी हैराण झाले. या व्हिडिओला आतापर्यंत १.६० पेक्षा अधिक व्यक्तींनी पाहिले आहे. 

व्हि़डिओ :  पाहू या 'चमत्कारीक' गोल

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.