पाकिस्तानच्या पराभवाने संपातलेल्या फॅनने केलं असं काही...

 गेल्या शनिवारी एशिया कप टी-२० मालिकेच्या सामन्यात पाकिस्तानचा भारताने पराभव केला. कमी स्कोअरच्या या सामन्यात विराटच्या शानदार खेळीने पाकिस्तान पराभूत झाला. 

Updated: Feb 29, 2016, 06:22 PM IST
पाकिस्तानच्या पराभवाने संपातलेल्या फॅनने केलं असं काही...  title=

दुबई :  गेल्या शनिवारी एशिया कप टी-२० मालिकेच्या सामन्यात पाकिस्तानचा भारताने पराभव केला. कमी स्कोअरच्या या सामन्यात विराटच्या शानदार खेळीने पाकिस्तान पराभूत झाला. 

भारताकडून पाकिस्तानचा झालेला हा पराभव पाकिस्ताना फॅनला बिल्कुल पसंत पडला नाही. तो संतापला. दुबईत राहणाऱ्या या पाकिस्तानी फॅनने आपल्या संघाच्या पराभवानंतर एक व्हिडिओ इंटरनेटवर पोस्ट केला. 

या व्हिडिओमध्ये त्याने पाकिस्तानेच पंतप्रधान नवाज शरीफ यांना एक 'मौका' देण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानी संघाकडून खेळून आपल्या फलंदाजीचा कारनामा दाखवू इच्छित आहे.

फलंदाजी करता आली नाही तर अशी शिक्षा द्या की माझे हात तोडून टाका. 

पाहा हा व्हायरल झालेला व्हिडिओ..