कोलंबो : भारतीय संघात सिरीजमध्ये कमबॅक करण्याची क्षमता असल्याचा विश्वास भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला आहे. खेळाडू उद्यापासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत.
भारतीय संघाने गाले टेस्टमध्ये बहुतांश काळ दबदबा राखल्यानंतर अखेरच्या क्षणी नांगी टाकली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
कोहलीने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही कमबॅकची क्षमता ठेवतो, जे काही झालं त्याचा विचार करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही कोणत्याही टेस्टच्या सहा सत्रात दबदबा कायम राखण्यात यशस्वी झालात त्याचा अर्थ तुम्ही मॅच जिंकली पाहिजे. पण मागील टेस्टमध्ये असे झाले नाही.
पण आम्ही पुढील टेस्टसाठी चांगली तयारी केली आहे. आम्हांला यातून शिकले पाहिजे आणि आम्ही लढले पाहिजे. आता पराभवातून पुढील मॅचसाठी सज्ज होण्याची वेळ आहे.
ऑलराउंडर स्टुअर्ट बिन्नीला अंतीम ११मध्ये सामील करण्याबद्दल विराट म्हणाला, बिन्नीच्या आगमनाने आमच्या गोलंदाजीतील संतुलन वाढले आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केल्याने मदत होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.