वेस्ट इंडिजचे क्रिकेट समालोचक टोनी कोझीअर यांचं निधन

गेली जवळपास 55 वर्षापांसून क्रिकेट रसिकांच्या मनात आपल्या कॉमेंट्रीने वेगळी जागा निर्माण करणारे वेस्ट इंडिजचे क्रिकेट समालोचक टोनी कोझीअर यांचं निधन झालंय.

Updated: May 12, 2016, 01:05 PM IST
 वेस्ट इंडिजचे क्रिकेट समालोचक टोनी कोझीअर यांचं निधन title=

नवी दिल्ली : गेली जवळपास 55 वर्षापांसून क्रिकेट रसिकांच्या मनात आपल्या कॉमेंट्रीने वेगळी जागा निर्माण करणारे वेस्ट इंडिजचे क्रिकेट समालोचक टोनी कोझीअर यांचं निधन झालंय.  ते 75 वर्षांचे होते.  

1962मध्ये वेस्टइंडिजच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यांनी प्रथम समालोचन केलं. तेव्हापासून क्रिकेट हेच त्यांचं जीवन बनलं. आयसीसीसह जगभरातल्या दिग्गज क्रिकेटपटू आणि लेखकांनी टोनी कोझीअर यांना आदरांजली वाहिली आहे.  

कोझीअर यांच्या जाण्यानं वेस्ट इंडिजच्या क्रिकेटचं अपरिमित नुकसान झाल्याची भावना व्यक्त होतेय.