धोनीने प्रॅक्टीस करताना फोटो पत्रकारासोबत केली मस्करी

 महेंद्र सिंह धोनी इतक्या आजाणपणे मस्करी करतो की कोणाला माहीतही होत नाही की तो मस्करी करतो आहे. याचा अनुभव एका फोटो पत्रकाराला आला. टीम इंडिया सराव करताना बाउंड्रीजवळ धोनी पॅड बांधत होता. त्यावेळी एक सीनिअर फोटो पत्रकाराने त्याला म्हटले, 'माही, तू पहिल्यासारखा माही राहिला नाही जसा तू २००४-०५मध्ये होता. त्यावेळी तू चांगला पोज देत होता. 

Updated: Feb 27, 2015, 08:15 PM IST
धोनीने प्रॅक्टीस करताना फोटो पत्रकारासोबत केली मस्करी title=

पर्थ :  महेंद्र सिंह धोनी इतक्या आजाणपणे मस्करी करतो की कोणाला माहीतही होत नाही की तो मस्करी करतो आहे. याचा अनुभव एका फोटो पत्रकाराला आला. टीम इंडिया सराव करताना बाउंड्रीजवळ धोनी पॅड बांधत होता. त्यावेळी एक सीनिअर फोटो पत्रकाराने त्याला म्हटले, 'माही, तू पहिल्यासारखा माही राहिला नाही जसा तू २००४-०५मध्ये होता. त्यावेळी तू चांगला पोज देत होता. 

धोनीने फोटो पत्रकाराला म्हटले, खोटं बोलू नको, तू मला २००४मध्ये ओळखत पण नव्हतात आणि पोज देण्याचं बोलताहेत... फोटोग्राफर म्हणाला, काय बोलतोय, तुझ्या पहिल्या सिरीजवेळी मी बांगलादेशमध्येच होतो. त्यावर धोनीने त्याला अजून कन्फ्यूज करून म्हटले की, तुम्हांला कोणी सांगितलं की मी पहिला मालिका बांग्लादेशाविरूद्ध खेळलो. तुम्हांला हे देखील माहीत नाही... 

खरं म्हणजे धोनीने डिसेंबर २००४ मध्ये बांग्लादेश विरुद्ध पहिला मालिका खेळली होती. यावर फोटोग्राफर म्हटला की, मग तू झिम्बाब्वे विरोधात पहिली सिरीज खेळला होता का?  यावर सर्व हसायला लागले आणि धोनीने हसून म्हटले, पाहा, यामुळे पत्रकारांचा काही भरवसा नाही! 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.