नवी दिल्ली : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची बॉलीवूड आणि त्यासंबंधित रुची राहिलेली नाही. याबाबतचे ताजे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले.
मंगळवारी विराटला घड्याळ बनवणाऱ्या टिसॉट कंपनीचा ब्रँड अॅम्बेसिडेर म्हणून घोषित करण्यात आले. यादरम्यान त्याला बॉलीवूडशी संबंधित एक प्रश्न विचारण्यात आला. मात्र या प्रश्नाचे उत्तर काही विराटने दिले नाही.
बॉलीवूडच्या कोणत्या सेलिब्रेटीला तो पहिले घड्याळ गिफ्ट म्हणून देईल. यावर कोहली म्हणाला, सगळ्यात आधी मी माझ्या कुटुंबातील एका सदस्याला हे गिफ्ट देईल. मला कळत नाहीये हा प्रश्न मला का विचारला जातोय. या प्रश्नाचा इथे काय संबंध आहे. हे गिफ्ट माझ्या टीममधील एखाद्या सहकाऱ्यालाही मिळू शकेल. आपण येथे ज्याच्यासाठी आलो आहोत त्यावरच बोलूया. चर्चेला भरकटवू नका.
गेल्या काही दिवसांपासून विराट आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. दोघांनीही अद्याप यावर कोणतेही विधान केलेले नाही. मात्र यापूर्वी एकत्र दिसणारं हे जोडप आता मात्र दूर झाल्याचं पाहायला मिळतयं.