पाहा धोनीनंतर कोण होणार भारताचा विकेटकीपर

भारतीय टीमचा कर्णधार आणि एक उत्कृष्ठ विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीने २००४ मध्ये भारतीय संघात प्रवेश केला होता. धोनीने १२ वर्षात खूप मोठं यश मिळवलं. धोनीने त्याच्या वनडे करिअरमध्ये ९ हजारहून अधिक रन केले आहे. 

Updated: Jun 19, 2016, 06:39 PM IST
पाहा धोनीनंतर कोण होणार भारताचा विकेटकीपर title=

मुंबई : भारतीय टीमचा कर्णधार आणि एक उत्कृष्ठ विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीने २००४ मध्ये भारतीय संघात प्रवेश केला होता. धोनीने १२ वर्षात खूप मोठं यश मिळवलं. धोनीने त्याच्या वनडे करिअरमध्ये ९ हजारहून अधिक रन केले आहे. 

२०१४ मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पुढील २ ते ३ वर्षात धोनी वनडे मधूनही निवृत्ती घेईल असं म्हटलं जातंय. जर धोनी वनडेमधून ही निवृत्त झाला तर त्याची जागा कोण घेवू शकतो याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता असेल.

१. के.एल राहूल :

जिम्बाब्वे विरोधात पहिल्याच वनडे सामन्यात शानदार शतक झळकवणाऱ्या राहुलने भारतीय टेस्ट टीममध्ये स्वत:ची जागा नक्की केली आहे. राहुलने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०१४ मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. राहुलने ५ टेस्ट मॅचमध्ये २ शतकांच्या मदतीने २५६ रन केले होते.

२. नमन ओझा : 

भारतचा सगळ्यात हुशार विकेटकीपर नमन ओझाला मोठी संधी मिळाली नाही. घरगुती क्रिकेटमध्ये चांगली खेळी करणाऱ्या ओझाला भारतीय टीममध्ये संधी मिळवता आली नाही. धोनीच्या चांगल्या विकेटकीपिंगमुळे ओझाला संधी मिळाली नाही. 

३. रिद्धीमान शाह : 
रिद्धीमान शाहा बंगालमधला एक हुशार विकेटकीपर आणि बॅट्समन आहे.  टेस्ट क्रिकेटमध्ये धोनीने संन्यास घेतल्यानंतर शाहने भारतीय टेस्ट टीममध्ये तो विकेटकीपरच्या रुपात आला.

४. रॉबिन उथप्पा :

3० वर्ष कर्नाटकचा विकेटकीपर म्हणून खेळणारा रॉबिन उथप्पा आणखी एक उत्कृष्ठ खेळाडू आहे. रॉबिन उथप्पाची कीपिंग ऐवढी प्रभावीपणे दिसली नाही. पण त्याने बॅटींगमधून भारतीय टीममध्ये चांगली कामिगिरी केली.

५. संजू सॅमसन : 

२१ वर्षीय युवा विकेटकीपर संजू सॅमसन अंतराष्ट्रीय टी-ट्वेटी मॅचमध्ये भारतीय संघासाठी खेळला आहे. अनेक जण संजूला धोनीनंतर एक चांगला पर्याय म्हणून पाहतात. आयपीएलमध्ये सॅमसनने त्याच्या खेळीने अनेकांना प्रभावित केलं आहे.