कोहली-फॉकनरमध्ये सामन्यादरम्यान शाब्दिक बाचाबाची

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कॅनबेरा येथे झालेल्या वनडे सामन्यात भारताचा उपकर्णधार विराट कोहली आणि जेम्स फॉकनर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

Updated: Jan 22, 2016, 09:44 AM IST
कोहली-फॉकनरमध्ये सामन्यादरम्यान शाब्दिक बाचाबाची  title=

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कॅनबेरा येथे झालेल्या वनडे सामन्यात भारताचा उपकर्णधार विराट कोहली आणि जेम्स फॉकनर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

याआधीही या दोघांमध्ये मेलबर्नच्या मैदानार शाब्दिक वाद झाला होता. त्यावेळी कोहलीने क्रिकेटमध्ये अनेकदा मी तुझ्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतलाय जा आणि गोलंदाजी कर असे म्हटले होते. त्यानंतर कॅनबेरा मैदानावर या दोघांमध्ये वाकयुद्ध पाहायला मिळाले. 

विराट सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करत होता. यादरम्यान फॉकनर कोहलीला रनआऊट करताना चुकला तेव्हा कोहलीने त्याला झोपेत खेळतोय का? असं विचारले.