कर्णधार धोनी ७ नंबरची जर्सी का घालतो?

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा लकी नंबर सात ही एकमेकांची ओळख आहे. अनेकदा या मुद्द्यावरुन त्याची खिल्लीही उडवली जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे धोनीला या नंबरची जर्सी कशी मिळाली ते. 

Updated: Feb 21, 2016, 09:51 AM IST
कर्णधार धोनी ७ नंबरची जर्सी का घालतो? title=

नवी दिल्ली : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा लकी नंबर सात ही एकमेकांची ओळख आहे. अनेकदा या मुद्द्यावरुन त्याची खिल्लीही उडवली जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे धोनीला या नंबरची जर्सी कशी मिळाली ते. 

अनेकदा धोनीचा लकी नंबर सात असल्याचे त्याचे चाहते सांगतात मात्र त्याला ही जर्सी संयोगाने मिळाल्याचे धोनीने लाईफस्टाईल ब्रँडच्या एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.  जेव्हा धोनी फुटबॉल खेळायचा तेव्हा त्याच्या जर्सीचा नंबर २२ होता. मात्र जेव्हा तो टीम इंडियात आला तेव्हा केवळ सात नंबरची जर्सी उपलब्ध होती. जी त्याला मिळाली. धोनीचा जन्म महिना आणि जन्म तारीख दोन्ही सात आहे. यामुळेच लोकांनीही सात या अंकाला लकी नंबरशी जोडलेय. 

जेव्हा मी लवकरच बाद व्हायचो अथवा खराब फॉर्ममध्ये होतो तेव्हा अनेकांनी मला जर्सी नंबर बदलण्याचा सल्ला दिला. मात्र मी तसे केले नाही, असे धोनी पुढे म्हणाला.