नवी दिल्ली : महेंद्र सिंह धोनीने बुधवारी वनडे आणि टी-20 फॉरमेटमधून कर्णधारपद सोडल्यानंतर धोनी आगामी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सिरीजमध्ये एक खेळाडू म्हणून खेळणार आहे.
बीसीसीआयला धोनीने वनडे आणि टी-20 फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचं निर्णय सांगितला. धोनीने हे देखील म्हटलं की तो खेळाडू म्हणून संघात राहिल. धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेटने खूप काही मिळवलं.
1. 24 सप्टेंबर 2007 ला धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करत टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचा खिताब जिंकला.
2. देशाला पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणारा धोनीचं होता.
3. धोनीच्या नेतृत्वात भारताने 28 वर्षानंतर 2011 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला.
4. 2013 मध्ये भारताने आयसीसी चँपियंस ट्रॉफी देखील जिंकली.
5. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये कॉमनवेल्थ बँक सीरीज जिंकली.
6. तो जगातला असा एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
7. वनडेमध्ये धोनी जगातील दुसरा असा कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वात 199 वनडेमध्ये टीम इंडियाने 110 मॅच जिंकल्या आहे.
8. टी-20 सामन्यांमध्ये जगातील तो एकमेव असा कर्णधार ज्याने 72 पैकी 41 सामने जिंकले आहेत.
9. धोनीच्या नेतृत्वातच भारताने 2 वेळा आशिया कपवर देखील आपलं नाव कोरलं.