नवी दिल्ली: २०१५च्या भारतीय वर्ल्डकप टीममध्ये दुर्लक्षित केलेल्या युवराज सिंहसाठी अद्याप टीमचे दरवाजे बंद झाले नाहीयेत. जर टीममधील काही खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये पास झाले नाही तर युवीला टीममध्ये संधी मिळू शकते. निवडकर्त्यांसमोर तेव्हा युवराज पेक्षा चांगला विकल्प नसेल.
भारतीय क्रिकेट टीममधील चार खेळाडू रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांच्या फिटनेसबाबत सध्या संशय आहे. त्यांना ७ फेब्रुवारीला फिटनेस टेस्ट पास करणं गरजेचं आहे. या दिवशी त्यांची फिटनेस टेस्ट होणार आहे. जर यातील कोणताही बॅट्समन फिटनेस टेस्टमध्ये पास झाला नाही तर युवराज सिंगला संधी मिळू शकते. युवीला सुद्धा अजूनही टीममध्ये सहभागी होण्याची आशा आहे.
जर जडेजा फिटनेस टेस्टमध्ये नापास झाला तर युवीला संधी मिळू शकते. युवराज डाव्या हातानं स्पिन करतो आणि त्याला ऑस्ट्रेलियामध्ये बॅटिंग करण्याचाही चांगला अनुभव आहे. २०११ वर्ल्डकरमध्ये युवराजनं शानदार प्रदर्शन केलं होतं आणि तो मॅन ऑफ द सीरिज होता. तसंच त्यानं चांगली बॉलिंगही केली होती.
भारतीय निवडकर्त्यांनी यावेळी तरूण खेळाडूंची निवड करत युवराज सिंह, हरभजन सिंह, विरेंद्र सेहवाग, झहीर खान आणि गौतम गंभीर सारख्या अनुभवी खेळाडूंची निवड केली नाही. युवराज सिंह टीममध्ये नसल्यानं निराश झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.