राफाअल नदालचं विम्बल्डनमधून पॅकअप

 ऑस्ट्रेलियाच्या 144 व्या मानांकित निक कोरोयिसनं वर्ल्ड नंबर वन आणि 14 ग्रँडस्लॅम पटकावणा-या राफाअल नदालचं विम्बल्डनमधून पॅकअप केलं.

AP | Updated: Jul 2, 2014, 10:07 AM IST
 राफाअल नदालचं विम्बल्डनमधून पॅकअप title=

लंडन : ऑस्ट्रेलियाच्या 144 व्या मानांकित निक कोरोयिसनं वर्ल्ड नंबर वन आणि 14 ग्रँडस्लॅम पटकावणा-या राफाअल नदालचं विम्बल्डनमधून पॅकअप केलं.

चौथ्या राऊंडमध्ये 19 वर्षीय निकनं नदालचा रंगतदार लढतीत 7-6, 5-7, 7-6, 6-3 नं पराभव केला. विम्बल्डनच्या 10 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा वाईल एंट्री मिळालेल्या टेनिसपटूला क्वार्टर फायनलमध्ये मजल मारता आली.

गेल्या वर्षी नदालला पहिल्याच राऊंडमध्ये आणि 2012 मध्ये सेकंड राऊंडमध्ये एक्झिट घ्यावी लागली होती. तर रशियन ग्लॅम डॉल मारिया शारापोव्हाचंही विम्बल्डनमधील आव्हान संपुष्टात आलं. नवव्या मानांकित ऍन्जली केरबनं शारापोव्हावर 7-6, 4-6, 6-4 नं मात केली. अव्वल सीडेड सेरेना विल्यम्सनंतर शारापोव्हालाही हार पत्करावी लागली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.