ट्राय सिरीजमध्ये पराभूत, पण आता का जिंकतेय टीम इंडिया- किर्ती आझादचा खुलासा

 वर्ल्ड कपमध्ये तयार करण्यात आलेल्या खेळपट्ट्या या तिरंगी मालिकेतील खेळपट्ट्याच्या तुलनेत अधिक सपाट असल्यामुळे भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नसल्याचा खुलासा भारताचे माजी ऑलराउंडर किर्ती आझाद यांनी केला आहे. भारताने तिरंगी मालिकेत एकही सामना जिंकलेला नव्हता. पण वर्ल्ड कपच्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. 

Updated: Mar 3, 2015, 08:04 PM IST
ट्राय सिरीजमध्ये पराभूत, पण आता का जिंकतेय टीम इंडिया- किर्ती आझादचा खुलासा title=

मुंबई :  वर्ल्ड कपमध्ये तयार करण्यात आलेल्या खेळपट्ट्या या तिरंगी मालिकेतील खेळपट्ट्याच्या तुलनेत अधिक सपाट असल्यामुळे भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नसल्याचा खुलासा भारताचे माजी ऑलराउंडर किर्ती आझाद यांनी केला आहे. भारताने तिरंगी मालिकेत एकही सामना जिंकलेला नव्हता. पण वर्ल्ड कपच्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. 

सन १९८३ च्या वर्ल्ड कप विजेता संघातील सदस्य असलेले आझाद म्हणाले, की त्यावेळी तापमान अधिक नव्हते. त्यामुळे चेंडू स्वींग होत होता. त्या स्थितीला आपण अनुकूलही झालो नव्हतो. आता उन्हाळा आला आहे. भारतीय संघासाठी हे चांगले वातावरण आहे. या शिवाय खेळपट्ट्याही चांगल्या आहेत. तिरंगी मालिकेत खेळपट्ट्यावर हिरवं गवत होतं आता ते संपूर्ण सुकलं आहे. तुम्हांला वाटलं तरी या खेळपट्ट्यांवर आता हिरवं गवत उगवणार नाही. त्यामुळ बदलत्या परिस्थितीचा भारताला फायदा होत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.