रागाच्या भरात अल्पवयीन क्रिकेटरची मैदानातच हत्या

क्षुल्लक कारणावरून बांग्लादेशात एका क्रिकेटरची भर मैदानातच हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय.

Updated: May 13, 2016, 03:38 PM IST
रागाच्या भरात अल्पवयीन क्रिकेटरची मैदानातच हत्या title=

ढाका : क्षुल्लक कारणावरून बांग्लादेशात एका क्रिकेटरची भर मैदानातच हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय.

प्रतिस्पर्धी गटाच्या बॅटसमननं स्टंपनं मारहाण करत १६ वर्षांच्या बाबुल शिकदार याची हत्या करण्यात आलीय.

अम्पायरनं नो बॉल देऊन बॅटसमनच्या बाजुनं निर्णय दिला होता. याआधीच्या बॉललाही अम्पायरनं नो बॉलचा सिग्नल दिला होता. त्यामुळे वैतागलेल्या बाबुलनं नो बॉलवरून अंम्पायरला टोमणा मारला.

हाच टोमणा बाबुलच्या अंगाशी आला... प्रतिस्पर्धी टीमच्या बॅटसमन यामुळे इतका नाराज झाला की त्यानं स्टंप उचलून बाबुलच्या डोक्यावर मारला. यामुळे तो मैदानावरच कोसळला. हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी बाबुलला मृत घोषित केलं.