5 वर्ष 9 महिने 30 दिवस, युवराजचा वनवास अखेर संपला

क्रिकेटमधला युवराजचा वनवास अखेर संपला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये युवराज सिंगनं सेंच्युरी झळकावली आहे.

Updated: Jan 19, 2017, 06:31 PM IST
5 वर्ष 9 महिने 30 दिवस, युवराजचा वनवास अखेर संपला  title=

कटक : क्रिकेटमधला युवराजचा वनवास अखेर संपला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये युवराज सिंगनं सेंच्युरी झळकावली आहे. वनडे क्रिकेटमधली युवराजची ही 14वी सेंच्युरी आहे. तब्बल 5 वर्ष 9 महिने आणि 30 दिवसांनी युवराजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेंच्युरी मारली आहे.

याआधी युवराजनं 2011च्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये सेंच्युरी झळकावली होती. 2011 वर्ल्ड कपवेळीच युवराजला कॅन्सरनं ग्रासलं होतं, तरीही युवराजनं लढवय्या बाणा दाखवत भारताला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. या वर्ल्ड कपमध्ये युवराजला मालिकाविराचा किताब देऊनही गौरवण्यात आलं होतं.

2011 वर्ल्ड कपनंतर मात्र युवराजला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. 2011 वर्ल्ड कपनंतरच्या 16 इनिंगमध्ये युवराजनं 18.32 च्या सरासरीनं रन केल्या होत्या. यामध्ये दोन हाफ सेंच्युरीचा समावेश होता.