मुंबई : क्रिकेटर युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल किच पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये गोव्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. युवराज आणि हेजल यांचा विवाह 30 नोव्हेंबरला होणार होता, असे सांगितले जात होते. मात्र, त्यांच्या लग्नाची तारीख पक्की करण्यात आली आहे डिसेंबरमध्ये.
युवी आणि हेजल गोव्यात लग्न करणार आहेत. 3 आणि 4 डिसेंबरला लग्न सोहळा पार पडणार आहे. मात्र, त्याआधी युवराच्या घरी चंदीगड, पंजाब येथे विवाह संगीत सोहळा, मेहेंदी कार्यक्रम होणार आहे. या समारंभाला निवडक मित्र परिवाराला निमंत्रित करण्यात आले आहे.
गोव्यात लग्न झाल्यानंतर मुंबईत युवी विवाह प्रित्यर्थ सोहळा ठेवणार आहे. यावेळी अनेक दिग्गज, क्रिकेट खेळाडू, मित्र परिवार आणि बॉलिवूडमधील स्टार मंडळींना आमंत्रित करणार आहे. हा भव्य कार्यक्रम असणार आहे, यावेळी युवी मोठी पोर्टी देणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान, युवी आणि हेजल यांच्या लग्नाची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.