संघात निवड झाल्यानंतर युवीने डिलीट केले 'ते' ट्वीट

इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियामध्ये कमबॅक करणाऱ्या युवराज सिंगने संघात निवड झाल्यानंतर एक ट्वीट केले होते. मात्र काही वेळातच त्याने हे ट्वीट डिलीट करुन टाकले.

Updated: Jan 7, 2017, 03:32 PM IST
संघात निवड झाल्यानंतर युवीने डिलीट केले 'ते' ट्वीट title=

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियामध्ये कमबॅक करणाऱ्या युवराज सिंगने संघात निवड झाल्यानंतर एक ट्वीट केले होते. मात्र काही वेळातच त्याने हे ट्वीट डिलीट करुन टाकले.

३५ वर्षीय युवराजने संघात स्थान मिळाल्याने ट्विटरवरुन आनंद व्यक्त केला. त्यावेळी त्याने उत्साहात ये बेबी असे ट्वीट केले. मात्र त्यानंतर काही वेळातच त्याने ट्वीट डिलीट केले. 

युवराज अखेरची वनडे ११ डिसेंबर २०१३मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. गेल्या वर्षी २७ मार्चला मोहालीमध्ये टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो खेळला होता. 

युवराजने यंदाच्या रणजी मोसमात पंजाबकडून खेळताना ५ सामन्यात ६७२ धावा केल्या. त्यानंतर मात्र तो खेळला नव्हता. नुकतेच त्याचे हेझल कीचसोबत लग्न झाले. युवराजच्या रणजीमधील कामगिरी पाहता त्याची इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांसाठी निवड करण्यात आलीये.