युवराजने २ चेंडुंसाठी २ वर्ष वाट पाहिली

शेवटच्या ओव्हरमध्ये युवराज पुन्हा व्हिलन होतोय, असं वाटत...

Updated: Feb 1, 2016, 01:54 PM IST
युवराजने २ चेंडुंसाठी २ वर्ष वाट पाहिली title=

सिडनी : युवराज सिंहसाठी रविवारी ऑस्ट्रेलियाविरोधात खेळला गेलेला सामना अत्यंत महत्वाचा ठरला. शेवटच्या ओव्हरमध्ये युवराज पुन्हा व्हिलन होतोय, असं वाटत असताना तो हिरो झाला.

दोन वर्षाआधी ६ एप्रिल २०१४ रोजी श्रीलंकेविरोधात टी - २० चषकात खेळताना, युवराजने २१ चेंडूत फक्त ११ रन्स केले होते. यावरून युवराजवर जोरदार टीका झाली होती.

दोन वर्षापासून युवराजच्या करिअरमधील बॅड पॅच त्या दोन चेंडूनी रविवारच्या सामन्यात घालवला. ऑस्ट्रेलिविरोधातील दोन सामन्यात युवराजला संधी मिळाली नाही, तरीही दोन वर्षानंतर टीम इंडियात परतलेल्या युवराजवर स्वत:ला सिद्ध करण्याचाही मोठा दबाव होता.

विराट कोहली बाद झाला, सामन्यात दबावाची स्थिती निर्माण झाली आणि युवराज पीचवर आला.

३१ चेंडूत विजयासाठी ५१ रन्सची गरज होती, युवराज बॅट फिरवत होता, पण फटका काही बसत नव्हता, युवराजवरील दबाव स्पष्ट दिसत होता.

प्रेक्षकांमध्येही यावरून चर्चा सुरू झाली, धोनीनेही खास युवराजला कस लावण्यासाठी घेतलं होतं.

सामन्यात शेवटी अतिशय बिकट आणि रोमांचक स्थिती निर्माण झाली. शेवटच्या १२ चेंडूत २१ धावा करण्याचं आव्हान होतं. मात्र हे आव्हान युवराजला व्हिलनवरून हिरो ठरवणारं होतं.

युवराज व्हिलन आणि हिरो या सीमारेषेवर उभा होता. युवराजने पहिल्या चेंडूला बॉण्ड्री बाहेर काढलं, दुसऱ्या चेंडूत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये षटकार मारला. 

या सामन्याची शेवटची ओव्हर माझ्यासाठीच होती, असं युवराजला वाटत असेल, कदाचित युवराज दोन वर्षापासून या दोन चेंडूंची तर वाट बघत नसेल ना?...