www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
येत्या २०१४ जुलैपासून सर्व नवे एटीएम मशीन बोलणारे असावेत, तसेच त्याचे ब्रेल की-पॅड उपलब्ध करण्यात यावे, असे रिझर्व बँकेने बुधवारी सर्व कमर्शिअल बँकांना निर्देश दिले आहे. सर्व एटीएम मशीनमध्ये (ऑडिबल) सूचना देणारी यंत्रणा असावी असे रिझर्व आदेश आहे.
यापूर्वी २००९ मध्ये रिझर्व बँकेने सर्व बँकांना अपंगांना अनुकूल असे एटीएम असावे अशा सूचना दिल्या होत्या.
तसेच सध्या असलेल्या एटीएम मशीनला ब्रेल की पॅड सह बोलणाऱ्या एटीएममद्य रुपांतरीत करण्याची योजना तयार करण्यास सांगितले आहे. तसेच त्याच्या स्थितीचा आढावा वेळोवेळी घ्यावा असेही सांगण्यात आले.
तसेच सध्या कार्यान्वित असलेल्या एटीएम सेंटरमध्ये आणि भविष्यातील एटीएम मध्ये रॅम्प असावे, जेणे करून अपंगांना व्हिलचेअरवरून व्यक्तींना एटीएममध्ये जाता येईल. तसेच एटीएम मशीनची उंची अशी असावी जेणे करून व्हिलचेअरवरील व्यक्ती सहजरित्या पैसे काढू शकतील.
तसेच सर्व बँक शाखांमध्ये भिंगाचा काच ठेवण्याची सुविधाही करण्याचे आदेश दिले आहे. ज्या व्यक्तींना लहान अक्षर वाचण्यात अडचणी येत असतील अशांसाठी ही सूचना करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.