www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
एक महत्वाची सूचना, सायबर कॅफेमध्ये जाणाऱ्या मित्र मैत्रिणींसाठी ! तुम्ही जे काही संगणकावर ओपन कराल. त्याची सर्व माहिती सेव्ह होतेय, हेही तुमच्या लक्षात येणार नाही. मात्र, त्यानंतर तुम्ही डोक्याला हात लावून बसाल. तुमची फसवणूक होवू नये, म्हणून तुम्ही काळजी घेतली पाहिजे.
तुम्ही सायबर कॅफेत गेलात. त्याठिकाणी पी.सी.च्या सी.पी.यु.ला एक पिन जोडलेली असते. ते तुम्हाला माहितही नसते. किंवा ती पिन दिसत नाही. मात्र, अशी पिन जोडलेला पीसी वापरलात तर तुमची हमखास फसवणूक झाली हे समजा. त्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे.
अशी पिन जोडलेली असेल, त्या पी.सी.चा वापर नका, कारण ती नुसती पिन नसून एक हार्डवेअर आहे. जे तुम्ही लॉगइन केल्यापासून तुमचा सर्व प्रायव्हेट डाटा त्या पी.सी.च्या हार्डडिस्कवर सेव्ह होतो. त्यात तुमच्या ई-मेल आयडीपासून इंटरनेट बँकिंगसह सर्व पासवर्ड सेव्ह होतात.
एकदा कि सर्व डेटा सेव्ह झाला की, चोरांचे फावते. ते आपल्या नेट बॅंकिंग तसेच ई-मेलची माहिती काढून तुमच्या बॅंकबॅलन्सवर डल्ला मारू शकतात. त्यामुळे सायबर कॅफेत जाताना सावधनता बाळगा आणि आपली फसवणूक टाळा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.