मोबाईल, लॅपटॉपचा बॅकअप कसा घ्याल!

संगणक आणि मोबाईल युगात बॅकअपला प्राधान्य दिलं गेलंय. आपला जमा केलेला डेटा कधी गायब होईल, याचा नेम नाही. त्यामुळे बॅकअप असणे गरजेचं आहे. मात्र, आपण बॅकअप कसे घेणार याची ही माहिती.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 27, 2013, 10:07 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
संगणक आणि मोबाईल युगात बॅकअपला प्राधान्य दिलं गेलंय. आपला जमा केलेला डेटा कधी गायब होईल, याचा नेम नाही. त्यामुळे बॅकअप असणे गरजेचं आहे. मात्र, आपण बॅकअप कसे घेणार याची ही माहिती.
आज मोबाइल, लॅपटॉप किंवा आपला पीसी (संगणक) सगळ्याचा बॅकअप घेऊन ठेवणं फार गरजेचं झालं आहे. अनेकवेळा आपला मेहनतीने गोळा केलेला डेटा कधी करप्ट होईल, याची शाश्वती देता येत नाही! कारण कुठे ही उपकरणं चोरीला गेली किंवा त्यात वायरस जाऊन ती चालेनाशी झाली की संपलंच सगळं म्हणून समजा.
आता यापासून तुम्हाला सुटका मिळेल. कारण बॅकअप घेणं आता सोपं आहे. काही टूल्स आणि सॉफ्टवेअर, ज्यामुळे तुमच्या मोबाइल, लॅपटॉप किंवा सोशल अकाउंटचा डाटा अगदी सहज बॅकअपमध्ये ठेवता येईल. ‘वन मीडिया हब’ या साइटवर साइन इन करायला हवं. येथे तुम्हाला ५०० एमबीचा क्लाऊड स्टोअरेज मिळतो. ही एक मोफत सुविधा असून क्रॉस प्लॅटफॉर्मला सपोर्ट करते.
या साइटच्या माध्यमातून युजर यातून आपल्या फोन किंवा डेस्कटॉपवर अॅप्लिकेशन इन्स्टॉल करू शकतो. यात तुमच्या जरुरी फाइल्सचा बॅकअप ठेवला जातो. पण फोन अॅतड्रेस बुक, मल्टीमीडिया आणि फाइल्सना दुसऱ्या उपकरणासोबत जोडता येतं. ‘फोनबुक’ नावाच्या क्रॉस प्लॅटफॉर्म सर्व्हिसमध्ये युजर फोनचे अॅंड्रेसबुक, मेसेज आणि कॅलेंडर डेटा यांचा बॅकअप घेऊन दुसऱ्या उपकरणाबरोबर जोडू शकतो.

हे अॅप्लिकेशन अँड्रॉइड आणि आयफोन दोघांना सपोर्ट करतं. याच्या वर्जनमध्ये ५०० कॉन्टॅक्ट्स, ५०० टॉक्स आणि ५०० नोट्स दोन उपकरणांवर जोडले जाऊ शकतात. यात बेसिक वर्जन मोफत आहे, तर अॅजडव्हान्स वर्जनसाठी तुम्हाला ठरावीक रक्कम मोजावी लागते.
तसेच फोनच्या कॉन्टॅक्ट बॅकअपसाठी ‘युलू’ अॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. यात एक मेसेंजरपण आहे, ज्यातून तुम्ही तुमच्या कॉन्टक्टला फ्री मेसेज पाठवू शकता. हे अॅप्लिकेशन वॉट्सअपशी साधर्म्य सांगणारं आहे. याव्यतिरिक्त तुम्ही स्कॅनडिस्क मेमरी झोन, इंडिफेंड मोबाइल बॅकअप, पीसी स्टुडिओ, मोबाईल गो अशा काही अॅप्लिकेशनचाही उपयोग कसा करायचा याची माहिती आपल्याला गुगलवर मिळते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.