डोळे-जीभेच्या इशाऱ्यांवर काम करणारा ‘मिनी’ कम्प्युटर!

आपल्या कानातल्या झुमक्यांच्या आकाराचा कम्प्युटर... ऐकून धक्का बसला असेल ना... होय, पण हा कम्प्युटर लवकरच प्रत्यक्षात येणार आहे... आणखी गंमत तर पुढेच आहे... कारण, हा कम्प्युटर केवळ तुमचे डोळे किंवा जीभेच्या इशाऱ्यावर काम करणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 6, 2014, 04:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
आपल्या कानातल्या झुमक्यांच्या आकाराचा कम्प्युटर... ऐकून धक्का बसला असेल ना... होय, पण हा कम्प्युटर लवकरच प्रत्यक्षात येणार आहे... आणखी गंमत तर पुढेच आहे... कारण, हा कम्प्युटर केवळ तुमचे डोळे किंवा जीभेच्या इशाऱ्यावर काम करणार आहे.
ब्लूटूथ, ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (जीपीएस), कंपास, गोयरो-सेन्सर, बॅटरी, बॅरोमीटर, स्पीकर आणि मायक्रोफोनसारख्या आधुनिक सुविधांनी सज्ज अशा या उपकरणाच्या साहाय्यानं उपभोक्ते नवंनवीन सॉफ्टवेअर्सदेखील डाऊनलोड करू शकणार आहेत.
जापानच्या हिरोशिमा युनिव्हर्सिटीचे इंजिनिअर काजुहिरो तनिगुची यांच्या म्हणण्यानुसार, या उपकरणाचं सध्या ‘इअरक्लिप टाईप विअरेबल पीसी’ असं नामकरण करण्यात आलंय. यामध्ये एक मायक्रोचिपसोबत डाटा स्टोरेजची सुविधाही उपलब्ध असेल. तसंच याला कोणत्याही स्मार्टफोन, आयपॉड किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसोबतही जोडता येईल.
‘हिरोशिमा सिटी युनिव्हर्सिटी’नं दिलेल्या माहितीनुसार, उपभोक्ते केवळ आपल्या चेहऱ्यांच्या हावभाव आणि हालचालिंद्वारे उदाहरणार्थ. भुवया उंचावणं, नाक हलवणं किंवा ओठ दाबणं यांसारख्या इशाऱ्यांनी या फोनला ऑपरेट करता येणार आहे. या उपकरणाचं हेच तर वैशिष्ट्यं आहे... कानातील आतल्या भागात झालेली छोटी छोटी हालचालींमुळे उत्पन्न झालेली संवेदनाही या उपकरणापर्यंत सहज पोहचू शकते.
याशिवाय हे उपकरण कमी ऐकू येणाऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या उपकरणासारखंही वापरता येणं शक्य आहे. हाताच्या नाडीचे ठोके किंवा शरीराचं तपमान तपासण्यासारख्या स्वास्थ्यासंबंधी काळजी घेण्यासही हे उपकरण उपयोगी ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.