www.24taas.com, लंडन
अपोलो १६ या मोहीमेमध्ये सहभागी असलेले अंतराळवीर चार्ल्स ड्यूक यांनी ४० वर्षांपूर्वी आपल्या पावलांचे ठसे उमटवले होते, एवढंच नाही, तर या ऐतिहासिक मोहीमेदरम्यान चार्ल्स याने आपल्या कुटुंबियांचा फोटोही सोडला होता.
अंतराळवीर चार्स्य ड्यूक आणि जॅन यंग २३ एप्रिल १९७२ मध्ये चंद्राच्या मोहीमेसाठी गेले होते. डेली मेल ने दिलेल्या माहितीनुसार लूनर मॉड्यूल पायलट ड्यूक याने आपली पत्नी आणि मुलांसोबत काढलेला फोटो तिथेच सोडला होता. हा फोटो अजूनही तिथेच आसल्याचे सांगण्यात येतं.
फोटोच्या पाठीमागे ड्यूकच्या कुटुंबियांच्या सदस्यांच्या सह्या केलेल्या होत्या आणि त्यावर संदेशही लिहिण्यात आला होता. हा फोटो एप्रिल १९७२ मध्ये चंद्रवर सोडण्यात आला. प्रोजेक्ट अपोलोच्या फोटो संग्राहात हा फोटो छापणयात आला होता.
या फोटोसंग्राहात चंद्रावर केलेल्या मोहीमेचे अनेक ऐतिहासीक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. ड्यूक याने अमेरिकन हवाई दलाद्वारे मिळालेले पदक चंद्रवरच ठेऊन दिले. तो १९७२ मध्ये आपला २५वा वढदिवस साजरा करत होता.
अपोलो १६ या अमेरिकन अपोलो अंतराळवीरांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ड्यूक ३६ व्या वर्षी पाऊल ठेवणारे दहावे आणि सर्वात तरुण अंतराळवीर ठरले होते.