www.24taas.com,लंडन
आयफोन आणि आयपॅडची जगावर मोहिनी घालणाऱ्या स्टीव्ह जॉब्स यांचे एक स्वप्न अधुरे राहीले. आयफोन आणि आयपॅडचे निर्माते स्टीव्ह यांना ‘आय-कार’ तयार करायची होती. मात्र, त्यांच्या निधनामुळे हे स्वप्नच राहिले.
स्टीव्ह जॉब्स यांनी आय-कार बनविण्याचे स्वप्न पाहिले होते, असे एका वृत्तपत्राने वृत्त देऊन स्टीव्हची इच्छा जगापुढे आणली. स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या सहकार्यां ना ही माहिती दिली होती. आपल्या मृत्यूआधी दिलेल्या मुलाखतीत त्यानी डेट्राईट कंपनी ताब्यात घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर दुसऱ्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अँपलच्या व्यवस्थापक मंडळावरील सदस्य मिकी ड्रेक्सलर यांनीही जॉब्स यांच्या या स्वप्नाला दुजोरा दिलाय.
अँपल कंपनीने या कार तयार कराव्यात व त्याच कार रस्त्यावर फिराव्यात अशी जॉब्स यांची मनापासून इच्छा होती. मात्र, प्रकृती अस्वास्थामुळे त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकले नाही.
‘आय-कार’चे डिझाईन जॉब्स यांच्या मनात होते. मात्र, ती कार बाजारात येऊ शकलेली नाही. ही कार जर बाजारात आली असती तर, त्याचा परिणाम अमेरिकेच्या बाजारावर झाला असता. तसेच, त्याला अत्यंत उत्तम प्रतिसादही मिळाला असता, असा दावा या वृत्तात करण्यात आलाय.
अँपलच्या या नव्या प्रकल्पाची कुणकणु लागल्यानेच गुगलने स्वत: कारनिर्मितीची तयारी सुरू केली. आज गुगलची गाडी बाजारात दाखल होईल, अशी शक्यता आहे. गुगलच्या गाडीचे काम प्रगतीपथावर आहे.