www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा २०१४ अंगर्तगत महाराष्ट्र सरकारच्या वनसेवेतील राजपत्रित, गट - अ व गट - ब ची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २७ एप्रिल २०१४ रोजी महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ मार्च २०१४ आहे.
फॉरेस्ट्रीमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण आहे. १) सहायक वनसंरक्षक ( असिस्टंट कॉन्झर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट) - (गट - अ) (१० पदे), २) वनक्षेत्रपाल ( रेंज फॉरेस्ट ऑफिसर) - (गट - ब) (२७२ पदे) भरण्यात येणार आहेत.
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
यासाठी पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातील खालील विषयांपैकी कमीत कमी एका विषयातील पदवीधर असावा. उंची - किमान १६३ सें.मी. (अनुसूचित जमातीसाठी किमान १५२.५ सें.मी.) तर छाती - न फुगवता किमान ७९ सें.मी. कमीतकमी फुगवण्याची क्षमता ५ सें.मी. असवी. दृष्टीदोष नसावा. पुरुष व महिला उमेदवारांनी अनुक्रमे २५ कि.मी. व १४ कि.मी. अंतर चार तासात चालून पूर्ण करण्याची शारिरीक क्षमता असणे आवश्यक आहे.
पूर्व परीक्षा- पूर्व परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असते. सामान्य ज्ञान (१०० प्रश्न) या विषयावर एकूण १०० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. अधिक माहिती आणि प्रवेश अर्ज www.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन भरायचे आहेत. अन्य माहितीसाठी www.mpsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.