www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुम्ही जर जी-मेल अकाऊंट वापरत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर... आता तुम्हाला तुमच्या जी-मेल अकाऊंटनं पैसेसुद्धा ट्रान्सफर करता येणार आहेत.
गुगलनं आपली गुगल वॉलेच यूजर्ससाठी खुलं केलंय. या वॉलेटच्या साहाय्यानं तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकाल. यासाठी तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापरही करता येऊ शकेल. अगोदर, गुगलला हेच वॉलेट मोबाईलसाठी बनवलेलं होतं. म्हणजे केवळ मोबाईलच्या साहाय्यानं हे ‘गुगल वॉलेट’ वापरुन तुम्हाला पैसे ट्रान्सफर करता येत होते. पण, आता हे अॅप्लिकेशन जी-मेल अकाऊंटला जोडण्यात आलंय. त्यामुळे आता जर तुमचं जी-मेल अकाऊंटच्या साहाय्यानं पैसे ट्रान्सफर करू शकाल.
ज्या यूजर्सनं ‘गुगल वॉलेट’ला आपलं बँक अकाऊंट लिंक केलंय, त्यांना एका क्लिकमध्ये आपल्या जी-मेल अकाऊंटवरून पैसे ट्रान्सफर करता येतील. यासाठी तुम्ही ज्याला हे पैसे ट्रान्सफर करत आहात, त्याचंही जी-मेल अकाऊंट असावं, असा अट्टहासही या सुविधेमध्ये नाही. परंतू, त्याच्याजवळ गुगल वॉलेटचं अकाऊंट मात्र नक्कीच असायला हवं.
आपल्या बँक अकाऊंट किंवा गुगल वॉलेट अकाऊंटवरून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला कोणताही चार्ज लागणार नाही. ही सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलीय. परंतू जे यूजर्स डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करतील त्यांना फी म्हणून २.९ टक्के फी एकदम भरावी लागेल. तुम्ही एका वेळेस १०,००० डॉलर आणि ५ दिवसांत ५०,००० डॉलर ट्रान्सफर करू शकतात.
सध्या तुम्ही या गुगल वॉलेटचा वापर तुमच्या पीसीवरून डेस्कटॉपवरून जी-मेलच्या साहाय्यानं पैसे ट्रान्सफर करू शकाल परंतू मोबाईलवर या वॉलेटचा वापर करण्यासाठी तुम्हाला wallet.google.com वर जावं लागेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.