www.24taas.com, चंदिगढ
१४ नोव्हेंबर... चाचा नेहरुंचा वाढदिवस... याचनिमित्तानं संपूर्ण देशभर बालदिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. याच आनंदात ‘गुगल’ही सहभागी झालंय... तेही थोड्या हटके स्टाईलनं.
भारतासह इतर देशांतीलही गुगलच्या कोट्यवधी युर्जसच्या होमपेजवर आज एका भारतीय लहानग्यानं रेखाटलेलं चित्र दिसतंय. गुगल डूडल म्हणून ओळखलं जाणारं चित्र काढलंय चंदिगढ इथल्या केंद्रीय विद्यालयात इयत्ता ९ वीत शिकणार्यात अरुण कुमार यादवने...
‘डुडल 4 गुगल’ या स्पर्धेसाठी अरुण कुमारनं हे चित्र रेखाटलं होतं. या स्पर्धेसाठी भारतातील ६0 शहरांतून २ लाख चित्रे आली होती. ‘युनिटी इन डायव्हर्सिटी’ हा यंदाच्या स्पर्धेचा विषय होता. त्यामध्ये अरुणनं काढलेल्या या चित्रानं वरचा नंबर पटकावलाय आणि हेच चित्र आज गुगल डूडल म्हणून वेबसाईटवर झळकतंय. सोमवारी रेल्वे संग्रहालय, नवी दिल्ली येथे झालेल्या सत्कार समारंभात या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात होती. लहान मुलांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील कलागुणांना संधी देणे हा आमचा प्रमुख हेतू असल्याचं गुगल इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी म्हटलंय.