www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
जगातली प्रमुख इंटरनेट कंपनी गूगल आता फोटो शेअरिंगवर जोर देणार आहे. गूगल इंडियाचे पणन संचालक संदीप मेनन यांनी सोमवारी जागतिक फोटोग्राफी दिवसानिमित्त ही घोषणा केलीय.
गूगलच्यावतीनं हे स्पष्ट करण्यात आलंय की, गूगल आता फोटो शेअरिंगवर विशेष लक्ष देईल. त्यासाठी एका विशेष टूलचा प्रस्तावही आहे.
ऑनलाईन फोटो शेअरिंग बाजारात सध्या फेसबूक, पिंटरेस्ट आणि फ्लिकरचा बोलबाला आहे. यात आता गूगलही सहभागी होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.