www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इंटरनेटने सीमा रेषा पुसून टाकल्या आहेत असं म्हणतात, याचाच आधार घेऊन गुगलने भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनानंतर, एकमेकांपासून दूर गेलेल्या मित्रांची भेट घडवून आणल्याचं व्हिडीओत दाखवलं आहे.
लाहोरचा इसम युसूफ आणि दिल्लीतले बलदेव यांची भेट घडवण्यात, बलदेव यांची मुंबईतली नात महत्वाची भूमिका बजावते. मुंबईत सर्वात जास्त इंटरनेट युझर्स असल्याने बलदेव यांची नात मुंबईतील दाखवण्यात आली आहे. हा व्हिडीओ प्रेक्षकांनी यू-ट्यूबवर डोक्यावर घेतला होता.
या व्हिडीओत लाहोर आणि नवी दिल्लीचं पारंपरिक रूप दिसून येतं. आज सर्व काही बदललं असलं, गुगल नव्या जमान्यातं एक माध्यम असलं तरी, 60 वर्षापूर्वी विभाजनाने एकमेकांपासून लांब गेलेल्या लोकांनाही शोधून काढू शकतो, असं गुगलने दाखवलं आहे.
यात गुगलवर नेमकं काय-काय सर्च होतं. गुगल हा तुमच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला कसा कामाचा आहे, हे या जाहिरातीतून मांडण्याचा यशस्वी प्रयोग गुगलने केला आहे.
या व्हिडीओतील प्रत्येक क्षण अतिशय कमी वेळेत छान आणि सुंदर रंगवण्यात आले आहेत. संगीतही छान जमलंय, विभाजनाचं दु:ख आजही हे संगीत जिवंत करतं.
मात्र सर्व काही बदललं असलं, तरी या दोन्ही मित्रांना नातू आणि नातीने नव्या जमान्याशी जोडल्याचं चपलखपणे जाहिरातीत बसवलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.