लिटरला २६ किलोमीटर धावणारी कार

जापानी कार होंडाने भारतातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन मॉडेल बाजारात आणण्याचा विचार केला आहे. होंडाची नवी सिटी कार लॉन्च करण्यात येणार आहे, ही कार लिटरला २६ किलोमीटरपर्यंत धावणार आहे.

Updated: Jan 7, 2014, 11:28 AM IST

www.24taas.comझी मीडिया, मुंबई
जापानी कार होंडाने भारतातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन मॉडेल बाजारात आणण्याचा विचार केला आहे. होंडाची नवी सिटी कार लॉन्च करण्यात येणार आहे, ही कार लिटरला २६ किलोमीटरपर्यंत धावणार आहे.
ही डिझेल इंजिन कार असणार आहे, विशेष म्हणजे कार भारतासारख्या देशात इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, हे पाहून ही कार तयार करण्यात आली आहे.
तसेच या कारमध्ये व्हायब्रेशन नाही, सर्वसाधारण डिझेल कारमध्ये व्हायब्रेशन असतं, व्हायब्रेशन नसल्यामुळे कारचं ड्रायव्हिंगही सुखकर होणार आहे. तसेच कारमधील प्रवाशांचा प्रवासही अधिक आरामदायी होणार आहे.
होंडाने पेट्रोल कारही बाजारात आणण्याचं ठरवलं आहे, ही पेट्रोल कार लीटरला १७.८ किलो मीटर धावेल, असा दावाही होंडान केला आहे.
या कारमध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे, ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोलची सुविधाही या कारमध्ये देण्यात आली आहे. मागील वर्षी होंडाच्या सेगमेंट कारच्या अमेजने बाजारात धुमशान आणलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.