निवडणूक आयोग आणि गूगलच्या करारावर काँग्रेस नाराज

आगामी निवडणुकांसाठी मतदारांच्या सुविधेसाठी निवडणूक आयोगाने गुगलशी करार केला आहे. या करारावर काँग्रेस नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Jan 8, 2014, 07:48 AM IST

 www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आगामी निवडणुकांसाठी मतदारांच्या सुविधेसाठी निवडणूक आयोगाने गुगलशी करार केला आहे. या करारावर काँग्रेस नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.
कोणत्याही कंपनीशी असा करार करण्याआधी, सर्व पक्षांशी चर्चा करायला हवी होती, अशी चर्चा न करता गुगलशी करार केल्याने काँग्रेस आणि भाजप नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.
काँग्रेसने यावर मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून या प्रस्तावित कराराविषयी चिंता व्यक्त केली आहे. या करारामुळे निवडणूक प्रक्रिया आणि राष्ट्रीय सुरक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा काँग्रेसने व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे विधी आणि मानवाधिकार विभागाचे प्रभारी सचिव के सी मित्तल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे. निवडणूक आयोग आणि गुगलमध्ये झालेला करार, हा संवेदनशील मुद्दा आहे, कोणत्याही राजकीय पक्षाशी चर्चा न करता, हा निर्णय घेतला गेला आहे, असं यावरून दिसतंय.
निवडणूक आयोगाने अमेरिकन कंपनी गुगलने केलेल्या विनंतीनंतर ऑनवाईन मतदार नोंदणी आणि मतदान कार्ड नंबर तसेच मतदान केंद्रांच्या बाबतीत महत्वाची माहिती उपलब्ध करण्याबाबतचा करार करण्यात यावा, असा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर ठेवला आहे.
दुसरीकडे भारतातही सॉफ्टवेअर बनवणाऱ्या दिग्गज कंपन्या आहेत, तरीही गुगलशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने सुरू ठेवला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.