www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सोशल नेटवर्किंग वेबसाईट इन्स्टाग्रामवर ८० वर्षांच्या एका आजीबाईंना बॅटी सिम्पसन यांना त्यांचे चाहते प्रेमानं `इन्स्टोग्रॅनी` म्हणून बोलावतात. याचं कारणही तसंच आहे. केवळ दोन महिन्यात या इन्स्टोग्रॅनीनं ८६ हजारांहून जास्त फ्रेंडस् बनवलेत.
याच वर्षी जानेवारी महिन्यात या आजीबाईंनी आपलं अकाऊंट उघडलंय. सिम्पसन आजी कॅन्सरग्रस्त आहे आणि आजींच्या नातवानंच त्यांचं हे अकाऊंट उघडलंय.
बैल्डन या आजीच्या नातवाच्या म्हणण्यानुसार, आपल्या आजीला कॅन्सरशी झुंजताना लढताना पाहून ही कल्पना आपल्याला सुचली. आपली आजी सोशल नेटवर्किंग साईटवर आली तर लोकांमध्येही या आजाराबद्दल जागृकता निर्माण होईल आणि लोकांना प्रेरणाही मिळेल.
`बैल्डन माझ्यावर खूप प्रेम करतो... माझ्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत अनेक किस्से तो सोशल नेटवर्किंगच्या साहाय्यानं लोकांशी शेअर करतो... त्यामुळेच मला लोकांचं इतकं प्रेम मिळालंय` असं सिम्पसन आजींनी म्हटलंय. आजींचे सगळेच फॅन्स त्यांनी लवकर बरं व्हावं, यासाठी प्रार्थना करताना दिसतायत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.