www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
बाजारात आपली मागणी वाढवण्याच्या हेतूनं पर्सनल कम्प्युटर बनवणारी ‘लिनोव्हा’नं शुक्रवारी नवीन ‘योगा टॅब्लेट’ लॉंच केला आहे. या टॅबलेटची किंमत २२,९९९ रूपयांपासून ते २८,९९९ रूपयांच्या आसपास आहे.
कंपनी अधिकाऱ्यांच्यामते योगा टॅब्लेटला अशाप्रकारे तयार करण्यात आलंय, जेणेकरुन जास्त कालावधीसाठी टॅब्लेट पाहता यावा. जिथं २०.३ सेंटीमीटर मॉडेलची किंमत २२,९९९ रुपये आहे, तिथंच २५.४ सेंटीमीटर मॉडेलची किंमत २८,९९९ रुपये आहे.
“आईडीसीच्या रिपोर्टनुसार मागील चतुर्थांश टॅब्लेट विभागामध्ये ३ टक्के इतकी बाजारात आमची हिस्सेदारी होती आणि २-३ महिन्यामध्ये १४.३ टक्क्यांनी दुसरं स्थान पटकावलं आहे,” असं टॅब्लेट लॉंचच्या वेळी, लिनोवो इंडियाचे संचालक शैलेन्द्र कात्याल यांनी सांगितलं.
ते पुढं म्हणाले, ‘उत्पादनांना प्रोत्साहन देणं तसंच उत्पादनांमध्ये किरकोळ उपस्थिती बनविण्याच्या दृष्टीनं व्यवसायामध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.