www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्स लवकरच तीन मोबाईल हॅण्डसेट बाजारात आणणार आहे.
कंपनीचे हॅण्डसेट सध्या निर्यात केले जात आहेत. यात मायक्रोमॅक्स A300, A092 आणि AE90.
यानंतरचे दोन्ही सेट ड्युअल कोर क्वाड कोर हॅण्डसेट असतील. A300 तर ओक्टा किंवा हेसा कोर प्रोससर युक्त असणार आहे. या फोनची किंमत कमीत कमी 17 हजार रूपये असणार आहे.
A300 ची किंमत मायक्रोमॅक्स कॅनवास नाईटपेक्षा कमी आहे. मायक्रोमॅक्स A092 ड्युअल सिम फोन आहे. या फोनचा स्क्रीन 4 इंच आहे. तर फोन AE90 हा डुअल सिम आहे, मात्र स्क्रीन 4.5 इंचाची आहे. यात एक सिम सीडीएमएचं असू शकतं.
दोन्ही फोनमध्ये जास्त फीचर असतील असं वाटत नाही. कारण या फोनची किंमत 7 हजार रुपये आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.