फेसबुकचे नवे मिशन; मतदारयादीत करा रजिस्ट्रेशन!

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने सामाजिक बांधिलकी जपतांना भारतातील युवकांना मतदारयादीत नावनोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन देणे सुरू केले आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकांना नजरेसमोर ठेऊन फेसबुकने हे फिचर उपलब्ध करून दिले आहे.

Updated: Sep 23, 2013, 08:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने सामाजिक बांधिलकी जपतांना भारतातील युवकांना मतदारयादीत नावनोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन देणे सुरू केले आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकांना नजरेसमोर ठेऊन फेसबुकने हे फिचर उपलब्ध करून दिले आहे.
सुमारे ८२ दशलक्ष भारतीय फेसबुकचा वापर करत असतात. त्यामुळे फेसबुक हे नवीन विचार प्रसारीत करण्याच प्रभावी माध्यम ठरत आहे.
देशासमोरील समस्या कोणत्या? सामाजिक प्रश्न, प्रलंबित विकासकामं,इ.बद्दल विचारांचे आदान-प्रदान व्हावा,यासाठी फेसबुकने हे फिचर सुरू केले आहे.
फेसबुकवर पोस्ट टाकण्यापुर्वी,आधीच्या स्टेटस,फोटो या ऑपशनसोबतच ‘लाईफ इव्हेंट’ हा आणखी एक ऑपशन आपणास दिसायला लागणार आहे.
जर तुमचे नाव मतदारयादीत नोंदलेले नसेल तर निवडणूक आयोगाच्या वेबसाइटची,लिंकही देण्यात आली आहे. मतदारयादीत नाव नोंदवणे का आवश्यक आहे?याबद्दलचे विचार याठिकाणी व्यक्त करता येतात.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१४ साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी जवळपास ७७८ दशलक्ष भारतीय नागरीक पात्र असतील.त्यापैकी १७ दशलक्ष नागरीक हे १८ ते १९ वयोगटाचे असून ते प्रथमच मतदान करतील.
२००९ साली झालेल्या निवडणूकीत ७१४ दशलक्ष नागरीक पात्र होते,त्यापैकी केवळ ५८.१९ टक्के नागरीकांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.