www.24taas.com,लंडन
रोजच्या बदलणाऱ्या जीवनात कुठली ना कुठली तरी नवीन यांत्रिक उपकरणं तयार होत असतात. आता संशोधकांनी अशाच एका नव्या उपकरणाचा... एका इलेक्ट्रिक कारचा शोध लावलाय... या कारचं वैशिष्ट्य म्हणजे ही कार चालवण्याचे कष्ट तुम्हाला घ्यावे लागणार नाही.
संशोधकांनी एक नवीन इलेक्ट्रिक स्मार्ट कार तयार केलीय. ही कार स्वतःच चालेल, स्वतःच थांबेल आणि स्वतःच पार्कही होईल. जेव्हाही चालक या कारला आवाज देईल किंवा हाक मारेल तेव्हा ही मालकाच्या सेवेसाठी हजरही होईल. आहे ना गंमत!
निस्सान कंपनीची एनएससी २०१५ कार फक्त एक प्रोटोटाईप आहे पण कारच्या निर्माता कंपनीला २०१५ पर्यंत या कारला बाजारात आणायचे आहे. ही कार कॅमेरा, कम्प्युटर आणि फोर जी कम्युनिकेशनच्या आधारावर काम करते. कारची रचना एवढी उत्कृष्ट प्रकारे केली आहे की रस्त्यावरचे सिग्नल्स चालू असताना काय करायचंय हेसुद्धा या कारला सांगायची गरज नाही... त्याचंही प्रोग्रामिंग यामध्ये केलं गेलंय.
विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार मात्र, या पद्धतीच्या कारचा मोठ्या प्रमाणात वापर होण्यासाठी आणखी काही अवधी लागेल.